प्रधानमंत्री फळ पिक विमा योजनेचे सर्व्हर डाऊन
क्रांतीभूमी मराठी न्यूज: सातोना प्रतिनिधी (गणेश मानकरी)
खरीप पीकविमा अजून दोन दिवस बाकी असताना च सर्व्हर डाऊन झाले आहे, त्यामुळे फळ उत्पादन शेतकरी अडचणीत सापडत आहे. वारंवार त्यांना CSC सेंटर वर चकरा मारत आहे.
30 जून ही अंतिम मुदत असून 28 तारखे पासूनच पिक विमा योजनेचे सर्व्हर डाउन झाले असून बरेच शेतकरी वंचित राहू शकतात, पुनर्रचित हवामान आधारित पिक विमा योजना ही महाराष्ट्रात चालू असून या योजनेमध्ये संत्रा, लिंबू ,सीताफळ, मोसंबी,पेरू, डाळिंब या पिकाचासमावेश आहे, पिक विमा योजनेसाठी नोंदणी चालू असून यामध्ये नोंदणी करण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत आधार सर्वर डाऊन या एररमुळे गेल्या दोन दिवसापासून शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे 14 जून ही अंतिम तारीख होती परंतु शासनाने तारीख वाढवून देऊनही 30 जून केली आहे अजून तारीख वाढून मिळवण्याची अशा शेतकऱ्यांना आहे.
Leave a Reply