लक्ष्मीबाई माध्यमिक विद्यालयाचा 93.75%निकाल

लक्ष्मीबाई माध्यमिक विद्यालयाचा 93.75%निकाल..

✒️क्रांतीभूमी मराठी न्युज
रामनगर (वार्ताहार) – जालना तालुक्यातील मौजपुरी येथील लक्ष्मीबाई माध्यमिक विद्यालयाचा मार्च 2025दहावी चा निकाल ९३.७५ टक्के लागला आहे.विद्यालयातून प्रथम क्रमांक कु. शिवकन्या गणपत काळे ८३.२०% ,द्वितीय क्रमांक कु. ऋतुजा विठ्ठल काळे ७९.६०%, तृतीय क्रमांक कु. शारदा मुरलीधर ढोकळे ७४.६०%, विशेष प्राविण्य ऐश्वर्या दत्तात्रय ढोकळे, निकिता किशोर कांबळे या विद्यार्थ्यांनी मिळविले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सौ. रमणताई बनकर, मुख्याध्यापक जयराम डुचे,लिपीक सर्जेराव डोंगरे, सरपंच बद्रीनारायण भसांडे, उपसरपंच सत्यनारायण ढोकळे, माजी सरपंच भागवत राऊत, माजी उपसरपंच आप्पासाहेब डोंगरे, सिध्दार्थ मोरे, नारायण डोंगरे, दिपक डोंगरे, राजेश महाडिक,निवृत्तीराव गायकवाड, प्रभाकर डोंगरे, सुधाकर ढोकळे, रामराव डोंगरे, नारायण गायकवाड, विष्णु डोंगरे,संतोष मोरे, राम जाधव,बंडु काळे, प्रभाकर गायकवाड,सोनाभाऊ खडेकर, सुरेश डोंगरे, शंकर गायकवाड,राम शेजुळ, विष्णु गायकवाड, मनोहर डोंगरे, राम गायकवाड, दत्ता ढोकळे,सर्व संचालक मंडळ,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *