श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रांजणी. इयत्ता १२ वीचा निकाल ८४.३८%
निकालाची परंपरा कायम.
दिनांक – ०५.०५.२०२५.
रांजणी प्रतिनिधी ( सचिन काजळे ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रू/ मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१२ वीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला असून श्री सरस्वती भुवन उच्च माध्यमिक विद्यालय रांजणीचा निकाल ८४.३८% इतका लागला आहे.प्रशालेने निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.यावर्षी ….
सर्वप्रथम – कु. धनवडे मनिषा विष्णू – (५०२/६००) ८३.६७ %
द्वीतीय – कु. बरसाले आयोध्या सोमेश्वर – (४८४/६००)८०.६७ %
तृतीय – कु. डोके निकिता मिलिंद – (४७५/६००)७९.१७ % या विद्यार्थिनींनी यश संपादन केले आहे.शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मध्ये उच्च माध्यमिक शालांत परीक्षेस कला शाखेचे ३२ विद्यार्थी बसले होते. पैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.०६ विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीत ११ , द्वितीय श्रेणीत ०६विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.०४ विद्यार्थी पास श्रेणीत आहे.
मागास प्रवर्गातून
*प्रथम* – कु.डोके निकिता मिलिंद – ७९.१७%
*द्वितीय* – कु.पवार उषा गणेश ७०.१७%,
कसबे प्रेम उत्तम – ७०.१७% या विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळवला.
सर्व गुणवंत,यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय समिती अध्यक्ष मा.श्री गौतमभाऊ देशमुख,प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा.श्री मधुकर बिरहारे सर, सन्माननीय शालेय समिती सदस्य,शाखा सभासद यांनी अभिनंदन केले आहे.
इ.१२ वीतील सर्व विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षक प्रा.श्रीमती कल्याणी अक्कर , प्रा.गौतम जाधव, प्रा अनिल पवार यांचे मार्गदर्शन लाभले.उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व पालक,प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.
Leave a Reply