ऐश्वर्या दुर्गे यांची महापारेषण विद्युत पुरवठा सहाय्यक पदी निवड
क्रांतिभूमी मराठी न्युज: – अंबड तालुक्यातील टाका दोन गाव येथील शेतकरी रामदास दुर्गे यांची मुलगी कुमारी ऐश्वर्या रामदास दुर्गे अंबड आयटीआय इथे शिक्षण घेऊन पुढील शिक्षण छत्रपती संभाजी नगर येथे चालू असताना ,महापारेषण मध्ये आत्ताच लागलेल्या भरतीच्या निकालामध्ये विद्युत पुरवठा सहाय्यक पदी निवड झाली .निवड झाल्याबद्दल आई वडील ,नातेवाईक, मित्रपरिवार यांनी कौतुक केले. तसेच छत्रपती संभाजी नगर येथील खिंडरे क्लासेस यांनी सुद्धा त्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जालना जिल्हा चर्मकार समाजाच्या वतीने त्यांचे ठिकठिकाणी सत्कार करून कौतुक करण्यात आले आहे.
Leave a Reply