20 वर्षानंतर पुन्हा एकदा 10 वी चा वर्ग भरला..

ओम शांती माध्यमिक विद्यालय झिरपी येथील वर्ग 10 वी बॅच 2004-05 या विद्यार्थ्यांचे एकत्रीकरण झालं.
क्रांतीभूमी मराठी न्युज प्रतिनिधी (राजू भोसले):-     गेल्या काही दिवसांपासून गेट-टुगेदर च्या माध्यमातून बऱ्याच वर्षापासूनची विद्यार्थी मित्र भेटत असतात त्याचप्रमाणे ओम शांती माध्यमिक विद्यालय झिरपी येथील वर्गातील एक मित्र व मैत्रीण वीस वर्षानंतर समोरासमोर आले परंतु दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते एका कामानिमित्त परिचय देण्याचं काम पडलं तेव्हा दोघांनाही कळालं की आपण एका वर्गात होतो आणि त्याच वेळेस ठरलं की असे भरपूर आपले वर्गमित्र मैत्रिणी असेल की जे आपल्यासमोर येतात परंतु आपणही त्यांना ओळखत नाही म्हणून आपण वर्षातून एकदा भेटायला हवे आणि गेट-टुगेदरच निमित्ताच्या माध्यमातून भेटण्याचे ठरवले धावपळीच्या युगामध्ये कुणी कुणाला वेळ देत नाही व सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक इन्स्टा टेलिग्राम यामुळे नात्यांमध्ये दुरावा देखील येत आहे म्हणून आपण एकदा तरी भेटावं याचं निश्चित झालं आणि तो दिवस ठरला.

दिनांक 25 मे रोजी ओम शांती माध्यमिक विद्यालय झिरपी येथील दहावी वर्गातील बॅच 2004 _ 5 या वर्गातील काही मित्रांनी व मैत्रिणींनी गेट-टुगेदर करण्याचे ठरवले व मातोश्री कृषी पर्यटन केंद्र लालवाडी या ठिकाणी मोठ्या उत्साहात सर्व शिक्षक व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना बोलावून दिवसभर वेगवेगळ्या मार्गदर्शनाच्या कार्यक्रमातून तसेच खेळाच्या माध्यमातून आपापल्या वाढलेल्या भूगोलासहित परिचय देण्यात आला. खूप मज्जा मस्ती केली व दिवस कसा गेला हे कळलेच नाही, आणि यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाळेचे शिक्षक माननीय बाबासाहेब फोके सर, हमने सर,पगारे सर,उघडे सर,बांड सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने भविष्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना समोर ठेवून मार्गदर्शन केले.
यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी देखील आपापले मार्गदर्शन व परिचय दिला.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी शीला नरवडे संदिप वखरे, राजेंद्र भोसले, मनिषा बरडे, नवाब सय्यद, सतीश राजगुडे, अविनाश जाधव, बाळासाहेब हमने आदी, विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
यावेळी सूत्रसंचालन संदीप वखरे तर कार्यक्रमांचे प्रास्ताविक राजेंद्र भोसले यांनी व आभार नवाब सय्यद यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *